प्रार्थना समाज आणि महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात
यातूनच मिशनरी मंडळींचा खोटेपणा आणि त्यांच्या तर्का मागील फोलपणाही त्यांना जाणवायला सुरुवात झाली. बायबलमधील चमत्कारिक व अप्रमाण वाटणाऱ्या बाबीदेखील विचारवंतांच्या लक्षात आल्या. त्यामागचा धर्मांतराचा गुप्त आणि लबाड हेतु त्यांना जाणवल्याशिवाय राहिला नाही. या सर्व गोष्टींमुळे आपल्या धर्माचा त्याग (धर्मांतर) करण्या ऐवजी आपल्या धर्माची आणि समाजाची नव्या युगाला साजेशी सुधारणा करण्याचा विचार समोर आला.