ईंधन Indhan
बालपणीच्या रम्य आठवणींवर अनेक कवींनी सुंदर कविता लिहिल्या आहेत. इंधन ही अशीच ही गुलजार यांची सुंदर कविता. पण ही केवळ बालपणीच्या रम्य आठवणींची कविता नाही. आपल्या नजरेसमोर जीवलग मित्रांच्या मृत्यू पाहणार्या एका प्रतिभावंताची ही कविता आहे.एका विषयापासून सुरुवात करून अत्यंत वेगळा आणि गंभीर शेवट करण्याची गुलजार यांना विलक्षण हातोटी आहे. गुलजार यांची त्रिवेणी आणि इतर काव्य ज्यांनी वाचली असेल त्यांना या त्यांच्या सामर्थ्याची पूर्ण कल्पना असेल …..
गाईच्या शेणाच्या गोवर्या थापतेवेळी बालवयात खेळलेले खेळ आणि त्याच्या आठवणी मित्राच्या मृत्यूनंतर अस्वस्थ करतात …. कवीस आणि तुम्हा-आम्हासही