marathi poetry

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी

अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे

वामांगी Vamangi by Arun Kolatkar

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रखुमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो
असु दे
रखुमाय तर रखुमाय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून

error: