पुरुषोत्तम आणि पद्मावती – ओरिसाच्या राजाची गोष्ट
आपल्या भारताच्या पुर्वेस ओडिसा नावाचे एक राज्य आहे बऱ्याच जणांनी ओडिसाला भेट दिली असेल. ओडिसा मध्ये भगवान जगन्नाथाचे सुंदर असे मंदिर पुरि या शहरामध्ये आहे. पुरी मध्ये दरवर्षी साधारणतः आषाढ महिन्या मध्ये रथयात्रा निघते. या पुरी शी, भगवान जगन्नाथा शी आणि तेथील राजे पुरुषोत्तम देवांशी संबंधित अशी ही एक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे.