चिडिया और चुरुगन

हरिवंशराय बच्चन यांच्या अनेक सुंदर कवितांपैकी एक कविता म्हणजे चिडिया और चुरुगन होय.
आपल्या आई वडिलांच्या अभ्यासक्रमात ही कविता होती….चिमणीचे एक सुंदरसे पिल्लू … जे अतिशय उत्सुकतेने आणि आश्चर्याने या जगाकडे बघते. आपल्यासारख्याच दिसणार्‍या पक्षांना उडतांना पाहून त्याला अतिशय आनंद होतो आणि अनिवार ओढ लागते की आपल्याला कधी उडता येईल? आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघतांना त्याला वारा वाहातांना दिसतो, झाडे डुलतांना दिसतात, पाने हलतांना दिसतात. फांदीवर बसल्यामुळे तो स्वतः देखील हलतोय. या फांदीवरून त्या फांदीवर आपल्याला जाता येतय, भूक लागली म्हणून मी खाली जाऊ इच्छितो आणि दरवेळेस त्याला वाटतय की वा! आपल्याला उडता यायला लागलय की काय? … म्हणून तो आईला विचारतो की “क्या मां मुझको उडना आया?”
त्यावर ती आई दरवेळी त्याला समजावण्याच्या सुरात सांगते की “नही चुरूगन तु भरमाया”
या झाडावरून त्या झाडावरही आपल्याला जाता येतय तरी आई म्हणते की मला अजून उडता येत नाही …

शेवटी ज्या वेळेस तो म्हणतो की मला हे निळे आकाश आता अनिवार साद घालते आहे आणि उड.. उड म्हणून मला आतून आवाज येतोय.त्या वेळेस मात्र आई म्हणते की आता तु खरा उडण्याच्या लायक झालाय

बालकविता असली तरी या कवितेत केवढा अर्थ समावलाय …

छोड घोंसला बाहर आया,
देखी डाली देखे पात,
और सुनी जो पत्ते हिलमिल,
करते है आपस में बात;

माँ, कया मुझको उडना आया?
“नहि चुरुगन, तू भरमाया”

डाली से डाली पर पहुंचा,देखी कलिया, देखे फूल,
उपर उठकर फुनगी जानी,
नीचे झुककर जांना मूल;

माँ, कया मुझको उडना आया?
“नहि चुरुगन, तू भरमाया”

कच्चे-पक्के फल पहचाने,
खाये और गिराये काट,
खाने-गाने के सब साथी,
देख रहे है मेरी बाटमाँ,

कया मुझको उडना आया?
“नहि चुरुगन, तू भरमाया”

उस तरु से इस तरु पर आता,
जाता हूं धरती की और,
दाना कोई कही पडा हो,
चुन लाता हूं ठोक-ठठोर;

माँ, कया मुझको उडना आया?
“नहि चुरुगन, तू भरमाया”

मै नीले अज्ञात गगन की,
सुनता हूं अनिवार पुकार,
कोई अंदर से कहता है,
उड जा, उडता जा पऱ मार;

माँ, कया मुझको उडना आया?
“आज सफल है तेरे डैने
आज सफल है तेरी काया”

– हरिवंशराय बच्चन

डैने = पंख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: