सुंदर मराठी भाषा

शेअर करा

मराठी भाषा अतिशय चमत्कार करू शकणारि आहे.जेवढे लालित्य भषाविलास, वाग्वैभव संस्कृत दाखवु शकते तेवढेच सामर्थ्य मराठीमधेहि आहे.व्याकरण, अलंकार, शब्दविभ्रम, वृत्तरचना यांचा समृद्ध असा खजिना हा संत अनि पंत कविमंडळींनी आनि शाहिरि कवींनि वारसारुपाने मागे ठेवलेला आहे.

अतिशयोक्ति अलंकार

मुंगी व्याली शिंगि झाली तिचे दूध किती?
अठरा रांजन भरुन उरले प्याले दोन हत्ती.

दमडिचं तेल आणलं
मामाजींची शेंडि झाली
भावोजींची दाढी झाली
सासुबाईंची न्हाणी झली
उरलं तेल झाकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
वेशीपर्यंत ओघळ गेला
त्यात उंट पोहून गेला

कुठे हि स्वस्ताई अन कुठे आताची १०० रु. लिटर तेलाचि महागाई?

पंत कवींचा आविष्कार

अलीकुल वहनाते वहन आणीत होती
शशीधर वहनाने लोटिली मार्गपंथी
नदीपति रिपू ज्याचा तात भंगून गेला
रवीसूत महि संगे फार दुःखीत झाला

काही कळलं का?

थांबा आपण प्रयत्न करूया…

अली=भुंगा
शशी= चंद्र,
शशिधर=चंद्र धारण करणारा=शंकर
नदीपती=समुद्र
रवीसुत=कर्ण=
महि=भूमी

आत्ता तरि कळलं का?….
नाही ठिकय…अजून अटकळ (क्लु) देतो..

मार्गपंथि=रस्त्यावर
रिपू=शत्रू
तात=वडिल
भंगून=फ़ूटुन……

आता जमतयं का?….
सोडा.. मीच सांगतो..
एक कुमारी – अलीकुल म्हणजे भोवऱ्याचे वाहन, म्हणजे कमळ,
त्याचे वाहन म्हणजे पाणी
म्हंजे पाणी आणत होती
तेवढ्यात
शशीधर वहनाने म्हणजे शंकराच्या वहनाने म्हणजे नंदीने म्हणजे बैलाने….लोटिली मार्ग पंथी
म्हणजे रस्त्यावर लोटून दिली
म्हणजे धक्का दिला
मग पुढे काय….
नदीपति रिपू ज्याचा
म्हणजे समुद्र ज्याचा शत्रू आहे तो..म्हणजे अगस्ती, त्याचा..तात भंगून गेला. हा अगस्ती, त्याचा बाप ….म्हणजे माठ..  तो भंगूण गेला
म्हणजे फूटला
म्हणजे माठ फुटला आणि..पुढे काय झालं अजुन?
तर..रवीसूत (सूर्याचा पुत्र) म्हणजे कर्ण म्हणजे कान, हा महिसंगे म्हणजे जमीनीला लागला
म्हणजे कानाला मार लागला
फार दुःखित झाला
म्हणजे कानाला दुखापत झाली


शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: