Not
मी, आपण कोण आहोत खरोखर? अनेक जणांनी या आदिम प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. अनेकांना आपले उत्तर सापडले देखील. असेच एक साधे सरल उत्तर या कवितेतही आहे. सुरुवात जरी नेती-नेती च्या सुरात तू ही नाहीस तू ते नाहीस अशी असली तरी नंतर मात्र कवितेने एखाद्या व्यक्तिमत्वाचा अंतस्थ धांडोळा घेणाऱ्या गोष्टींना गौरवान्वित करत ‘कोहम’ (who am I?) चे सुंदर उत्तर प्रस्तुत केले आहे. जाता जाता कवि ही देखील सांगून जातो की बेगडी गोष्टींच्या मागे लागल्यामुळे तू मूळ कोण आहेस याची आत्मविस्मृती तुला झाली आहे.