Author name: कारभारी

Farmer’s Produce Trade and Commerce Promotion and Facilitation Act, 2020 कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य संवर्धन आणि सुलभीकरण अधिनियम, 2020

एपीएमसी कायद्याचा सरळ सरळ संबंध हा राज्याच्या आतमध्येच आपला शेतीमाल विकावा या नियमाशी आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यावर आपला शेतमाल हा जवळच्या एपीएमसी मध्येच विकण्याचे बंधन होते.  राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर आपला शेतमाल  विकण्यासाठी एपीएमसी कायद्यामध्ये अनेक अडचणी आणि बंधने शेतकऱ्यांवर घालण्यात आलेली होती.  ही बंधने या नव्या कायद्यांतर्गत काढून टाकण्यात आलेली आहे म्हणजे आपला शेतमाल  बाहेरच्या राज्यातील व्यापाऱ्यांना विकण्यासाठी शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचे बंधन किंवा कायदेशीर अडथळा आता राहिलेला नाही. इतर कुठलाही शेतमाल  बनवणारा उत्पादन आपला शेतमाल  देशामध्ये कुठेही विकू शकत असे रंतु शेतकर्‍यांना हे स्वातंत्र्य नव्हते यामुळे शेतकऱ्यांना नवीन ऑप्शन उपलब्ध असते राज्य अंतर्गत आणि देशांतर्गत बाजारपेठेत उपलब्ध असेल नव्या वाणिज्य प्रकाराशी शेतकरी सामोरा जाईल आणि त्यातून नव्या गोष्टी शिकायला मिळतील.

minimum_support_price

Minimum Support Price (MSP) किमान आधारभूत मूल्य

परंतु एवढे सगळे उदारीकरणाचे वारे वाहून देखील शेतकर्‍याला आपल्या मालाची रास्त किंमत ठरवता येत नाही. त्याला आपला माल बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी ठरवलेल्या किमतीलाच विकावा लागतो. काही मोजक्या शेतीमालासाठी सरकार एक किमान किंमत निर्धारित करते. या किमतीलाच किमान आधारभूत किंमत (Minimum Support Price)/MSP असे म्हणतात. किमान किंमत मी यासाठी म्हणतो की या किमतीपेक्षा  कमी किमतीत तो माल कुणालाही खरेदी करता येणार नाही असे सरकारचे बंधन असते. आता आपल्याला हा प्रश्न पडला असेल की ही किमान आधारभूत किंमत कोण ठरवते? आणि कशी ठरवल्या जाते? 

What are the APMCs? एपीएमसी (कृषी उत्पन्न बाजार समिती) म्हणजे काय?

पण या सर्व घडामोडीत बाजार समितीतील दोष उघडपणे दिसू लागले शेतकऱ्यांसाठी च्या नव्या आर्थिक समीकरणात बाजार समिती अपुरी पडू लागली. बाजार समित्या शेतकर्‍यांचे शोषण करतात, अशी मांडणी शेतकरी संघटनेने या काळातच केली. १९६३ चा महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम व १९६७ चा कायदा कालबाह्य झाला आहे. त्यामुळे आपला शेतमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य शेतकर्‍याला मिळाले पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली.

shri chakrapani prabhu

१६ कामाक्षानीमीत्य पुरत्यागू

सर्वज्ञ पुढे म्हणतात, “बाई, काऊरळीची कामक्षा नावाची हठयोगिनी होती. तिने अनेक सिद्ध साधक तपापासून पथभ्रष्ट केले होते. ती गोसावींची ख्याती ऐकून त्यांना रती करण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे आली. चांगदेव राऊळ ब्रह्मचारी होते. ते आपल्या गुफेमध्ये बसलेले होते. कामाक्षा बाहेर येऊन बसली आणि तिने राऊळ प्रभूंनी विनवले की मला रतीप्रेम द्यावे. त्यावर श्री चांगदेव राऊळ तिला म्हणाले की आमची प्रवृत्ती ब्रह्मचर्याची आहे. आम्हाला श्री दत्तप्रभूंची आज्ञा आहे. ती आज्ञा उल्लंघून तू आत येऊ नकोस.

shri chakradhar swami

१८ जुतक्रीडा

गोसावीयांसि सारी जुं खेळावेयाची प्रवृति : मग गोसावी प्रतदीनीं जूआंठेयासि बीजें करीति : सारी जुं खेळावेयाचें वेसन स्वीकरीति : गोसावी प्रतदीनीं सारी जुं खेळति : जीतुकाही जीणा ए तीतुका दानासि देति : एकु दीं गोसावीं हारिची प्रवृति स्वीकरिली : बहुत जुं हारवीलें : मग पाउगीयें पायांवरि हात ठेउनि वीनवीलें : “जी जी : आंखू पाहिजो …

१८ जुतक्रीडा Read More »

shri chakradhar swami

१७ पुरस्वीकारू How shri Changadev Raul transmigrated soul in to body of Harpal dev

श्री चांगदेव राऊळ यांनी आपले शरीर त्यागल्यानंतर भाडोच च्या राजकुमार हरपाळदेव यांच्या शरीरात कसा परकाया प्रवेश केला हे या लीळे मध्ये वर्णीले आहे

१५ श्रीप्रभू भेटि

माहादाइसांप्रति सर्वज्ञे म्हणीतलें : “रीधपुर प्रांतीं रीधपुरा आणि नांदिगावांमाझारि दीढा गाउवांचेनि माने खेड’ नावं गव्हाण : तेथ काणवां ब्राह्मणाचां ग्रहीं श्रीप्रभु गोसावीं गर्भी अवतारू स्वीकरिला : मातें नावं नेमाइसें : पितेयां नावं आनंतनाएकू : गोसावियांचेया मातेयापितेया बहूतें लेकरूवें जालीं : तीएं जीतीचि ना : मग निपटनेयांचे गोसावी जाले : मग तेहीं गुंडो ऐसें नावं ठेविलें …

१५ श्रीप्रभू भेटि Read More »

१४ कामाक्षा सूगरणी म्हणणे

एकू दीसू गावीचे माहाजन गोसावीयांपासि बसले होते : तवं गोसावीं श्रीकरेंकरूनि टाळि वाइली : आणि उभे राहीले : श्रीमुखीं आंगुळी घातली : माहाजनी पूसीलें : “राउळो : ऐसें काइ?” गोसावी म्हणीतलें : “काउरळीची कामाक्षा अळजपूरी वडे पूरीया तळीत होती : पूरी काढीतां पोळली : ते तोंडी आंगुळी सूदली :” मग माहाजनी तोचि दीसू तोचि मासू …

१४ कामाक्षा सूगरणी म्हणणे Read More »

shri chakrapani prabhu

३ सूर्पमार्जनों क्रीडा Shri Changdev Raul cleans the surrounding

माहादाइसांप्रति सर्वज्ञे म्हणीतले : “बाइ : तेथिची क्रीडा ते ऐसी की : स्त्रीचांगदेवोराउळाचा उजवीये’ सीकरी सुप : डाबीये’ सीकरी खरांटा : बीदी गोदरीया झाडीति: सुपी पुंजे भरीति : ‘श्रीमुगुटावरि ठेवीति : नेउनि गोमतीमध्ये घालिति’ : आणि खुदुखुदुकरि हास्य करीति : ऐसे अनंता दान देति’:”

shri chakrapani prabhu

२ सैहाद्री व्याघ्रवेखें दरीसन Shri Dattatrey Prabhu did shaktipat to Shri Changdev Raul (Gosavi)

सगळे लोक पर्वतावर निघाले. गोसाविदेखील पर्वतावर निघाले. मोकळे केस, मधोमध भांग, श्याम श्रीमुर्ती, अशा वेशात ते देवगिरी वर प्रयाण करतात. त्याचवेळी वेळूच्या जाळीतून गर्जना करत वाघ बाहेर पडतो. श्री दत्तात्रय प्रभू वाघाचा वेष धारण करून येतात. पुढे येऊन उभे ठाकतात. हाक देऊन आपला चवडा उचलून श्रीमुकुटावर म्हणजे चांगदेव राऊळांच्या डोक्यावर ठेवतात. श्रीमुखासी श्रीमुख लावले. तेथे प्रकाश पडला. व्याघ्ररूपी श्री दत्तात्रयांकडून पर आणि अवर हे दोन्ही स्वीकारले. पर अच्छादिले म्हणजे झाकून ठेवले. आणि अवर प्रकट केले. वाघ! वाघ! असे म्हणत मागचे लोक मागे पळाले, पुढचे लोक पुढे पळाले. मग श्री दत्तात्रय प्रभू अदृश्य झाले.

error: