व्यक्तीवेध

Jamadar Bapu Lamkhade जमादार बापू लामखडे

आजच्या या जगामध्ये जिथे गँगस्टर लोकांना आयडॉल  म्हणून प्रस्थापित केले जात आहे तिथे अशा साध्या, सरळ, प्रामाणिक, आणि कर्तव्यदक्ष कस्टम अधिकाऱ्याची ही कहाणी फार कमी लोकांना माहिती आहे हे आपले दुर्दैव. मिर्झा उर्फ हाजी मस्तान हा मुंबईचा डॉन देखील ज्याला वचकून असायचा अशा या कस्टम खात्यातील  साध्या जमादाराची ही कहाणी आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आणि आदर्श आहे.

Mama Shree मामाश्री

मामांश्रींशी आमची पहिली ओळख आणि भेट तशी पाटील कॉलनीतच झाली. (खरं तर ते माझे काकाश्री. पण शिंदे परिवारातील सगळे मामाश्री म्हणायचे म्हणून मी देखील मामाश्री म्हणतो.) नंतर उस्मानपुऱ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात, निवांतपणे होणाऱ्या भेटींमध्ये मग मामाश्री हळू हळू समजायला लागले. वयस्कर पण शरीरावर वयाचा प्रभाव न जाणवू देणारी अंगकाठी, साधी पण समोरच्याच्या अंतःकरणात उतरून ठाव …

Mama Shree मामाश्री Read More »

Chandrabhga Aaji चंद्रभागा आजी

कधी कधी मला वाटतं की आजीचं आयुष्य म्हणजे जणू काही संत तुकारामाच्या अवलीचे प्राक्तन. संत तुकारामाच्या आवलीचं जसं झालं तसंच आजीच्याही वाट्याला आलं. काय म्हणून केलं नाही तिने तुकोबांसाठी? या आवलीने देवभक्तीत रंगलेल्या, घर-संसार विसरलेल्या तुकारामाची संसाराची सगळी आघाडी सांभाळली. भांडाऱ्याच्या डोंगरात काटे कुटे तुडवीत तुक्याच्या भुकेची भाकर झाली. महिनोन्महिने नामस्मरणात दंग तुकोबांचा संसार सांभाळला. पोराबळांचे सर्व काही पाहिले. तुकाराम महाराज वारीला गेल्यावर त्यांच्या येण्याची वाट पहात सर्व कर्तव्ये पार पाडली. आलेल्या संतमंडळींना कोंड्याचा मांडा करून खाऊ घातले. अडचण असून देखील नवऱ्या साठी मावंदे देखील घातले. गाभण जनावरांची आई झाली. एवढेच काय त्यांच्यासाठी वैकुंठाचा मोह टाळला. सर्वांना तिचा राग दिसला पण त्याग मात्र दिसला नाही. तुकाराम संत बनून सर्वांच्या नमस्कारास पात्र झाले. पण आवली मात्र उपेक्षितच राहिली. तुझीही कहाणी काहीशी अशीच आहे आजी. तूझ नाव चंद्रभागा. विठुरायाच्या गजरात चंद्रभागेच्या वाळवंटाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही आजी.

Yashawant vyakhyanmala ambad vakte

मी कसा घडलो

अंबड शहरांमध्ये 2011 सालापासून काही होतकरू तरुणांचा एक चांगला गट दरवर्षी यशवंत व्याख्यानमालेचे आयोजन करतो. या वर्षी 2020 साली या व्याख्यान माले ने आपले दहावी पुष्प गुंफले. मराठवाड्यामधील ग्रामीण भागात आणि अंबड सारख्या शहरात तरुणांनी दहा वर्ष एक उत्कृष्ट व्याख्यानमाला सुरू करणे आणि ती दहा वर्षे यशस्वीपणे राबवणे हे मला वाटतं त्यांच्या कामाची आणि यशाची पावती आहे. पद्मश्री रवींद्र कोल्हे, सुपर थर्टी चे जनक प्रा. आनंद कुमार, हनुमंतराव गायकवाड, साहित्यिक डॉ. रा. र. बोराडे आणि डॉ. उत्तम कांबळे, विधिज्ञ असीम सरोदे, मुक्ता दाभोळकर अशांसारख्या दिग्गज वक्त्यांना बोलावून त्यांनी अंबड सारख्या मराठवाड्यातल्या आमचा भागांमध्ये हा ज्ञानाचा वटवृक्ष रुजवला. अशा या व्याख्यानमाले मध्ये 2012 साली मी युपीएससी स्पर्धा परीक्षा पास झाल्यानंतर मला व्याख्यानाचे पुष्प गुंफण्याची संधी मिळाली. यशवंत व्याख्यानमाले ने दशकपूर्ती चा मुहूर्त साधून व्याख्यान माले मध्ये ज्यांचे ज्यांचे व्याख्यान झाले त्यांच्या व्याख्यानांची एक स्मरणिका काढली. माझे व्याख्यान ध्वनिमुद्रित केलेले नसल्यामुळे मला माझे व्याख्यान पुन्हा लिहून काढण्याचे विनंती करण्यात आली. व्याख्यानमालेत व्याख्यान देऊन दहा वर्ष झाल्यानंतर मला ही विनंती ती करण्यात आली होती. त्यामुळे मी त्या विषयावर जे काही बोललो होतो ते जसे आठवले तसे थोडक्यात लिहून काढले आहे. हा लेख त्या स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आलेला आहे. तोच लेख मी आज इथे तुमच्यासोबत शेअर करतो आहे.

error: