एखादा जवान जेव्हा एखाद्या आणीबाणीच्या प्रसंगी आपला जीव धोक्यात घालतो किंवा एखाद्या अशा क्षणी तो झडप घेतो जेव्हा त्याला माहीत असते की यात आपला प्राण जाणार आहे तेव्हा अशा क्षणी त्याला हा निर्णय घ्यायला भाग पाडणारा विचार काय असतो?
भगवद्गीतेत सांगितलेले
‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्’
हे तत्वज्ञान त्याच्या मनात असते की इतर कुठली प्रेरणा? हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला सांगता येणार नाही.
हे तोच सांगू शकेल जो या चक्रव्यूहामध्ये शिरला आहे. अनेक वेळा….. अनेक प्रसंगी….