संत तुकाराम

sant_tukaram

वीट

शेअर करा

‘प्रभात, चा संत तुकाराम हा चित्रपट पाहून बऱ्याच जणांचे असे मत बनले आहे.  वारकरी संप्रदायात संत तुकारामांनी सदेह वैकुंठगमन केले अशी एक कथा आहे. जेंव्हा त्यांना घ्यायला विमान येते तेंव्हा ते आपल्या पत्नी जिजाऊ ला देखील विमानात बसून वैकुंठाला घेऊन जाऊ इच्छितात. परंतु अध्यात्माचे आणि परमार्थाचे महत्त्व न कळलेली जिजाऊ वैकुंठाला जाण्यास नकार देते अशी कथा काही कीर्तनकार सांगतात.  वारकरी संप्रदायातील व्यक्तींना जिजाऊ हे एक परमार्थाची जाणीव नसलेले पात्र वाटते. परंतु खरंच जिजाऊ अशा होत्या का?


शेअर करा

Chandrabhga Aaji चंद्रभागा आजी

शेअर करा

कधी कधी मला वाटतं की आजीचं आयुष्य म्हणजे जणू काही संत तुकारामाच्या अवलीचे प्राक्तन. संत तुकारामाच्या आवलीचं जसं झालं तसंच आजीच्याही वाट्याला आलं. काय म्हणून केलं नाही तिने तुकोबांसाठी? या आवलीने देवभक्तीत रंगलेल्या, घर-संसार विसरलेल्या तुकारामाची संसाराची सगळी आघाडी सांभाळली. भांडाऱ्याच्या डोंगरात काटे कुटे तुडवीत तुक्याच्या भुकेची भाकर झाली. महिनोन्महिने नामस्मरणात दंग तुकोबांचा संसार सांभाळला. पोराबळांचे सर्व काही पाहिले. तुकाराम महाराज वारीला गेल्यावर त्यांच्या येण्याची वाट पहात सर्व कर्तव्ये पार पाडली. आलेल्या संतमंडळींना कोंड्याचा मांडा करून खाऊ घातले. अडचण असून देखील नवऱ्या साठी मावंदे देखील घातले. गाभण जनावरांची आई झाली. एवढेच काय त्यांच्यासाठी वैकुंठाचा मोह टाळला. सर्वांना तिचा राग दिसला पण त्याग मात्र दिसला नाही. तुकाराम संत बनून सर्वांच्या नमस्कारास पात्र झाले. पण आवली मात्र उपेक्षितच राहिली. तुझीही कहाणी काहीशी अशीच आहे आजी. तूझ नाव चंद्रभागा. विठुरायाच्या गजरात चंद्रभागेच्या वाळवंटाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही आजी.


शेअर करा
error: