केशाने आज कंपनीचे नाव राखले
शनिवार उजाडला. रात्री दहाला खेळ सुरू झाला. पडदा उचलला गेला. नाचणाऱ्या वल्लरीच्या ऐवजी, शांत आणि संयमी शारदेच्या रुपात केशवचे स्टेजवर आगमन झाले. केशवचा प्रवेश एवढी प्रभावशाली होती की ते टाळ्यांच्या कडकडाट झाला. नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. प्रत्येकाने जीव ओतून काम केले. केशवने गायलेल्या प्रत्येक गाण्यासाठी ‘वन्स मोअर’’ आला. विशेषतः ‘मूर्तिमंत भीती उभी’ या हे पद तर इतके रंगले की त्याला सलग, सहा वेळा ‘वन्स मोअर’ मिळाला.
परंतु, यामुळे बारा वर्षाचा केशव थकून गेला. पहिलाच दिवस आणि इतके गायन. थकवा अपरिहार्य होता. शेवटी व्यवस्थापक म्हैसकर स्टेजवर आले आणि त्यांनी केशवच्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करावा अशी सर्वांना विनंती केली.
“एक शेवटचा वन्स मोअर रे म्हैसकर!” शाहू महाराजांनी त्यांच्या आसनावरून ओरडले. केशव गायला. महाराज आणि सभागृह मंत्रमुग्ध झाले.