वैज्ञानिकांचे जीवन प्रयोगशाळेत आणि प्रयोगशाळेबाहेर अनेक विस्मयकारक घटनांनी भरलेलं असतं. अशा घटनांचे किस्से तयार होतात. जितका वैज्ञानिक अधिक प्रसिद्ध तितके अधिक किस्से. त्यातून वैज्ञानिकांच मानवी स्वभावाचं, तंच बुद्धिमत्तेचं आणि मोठेपणाचं दर्शन घडत असतं. हे किस्से जसे गमतीदार असतात तसेच ते उद्बोधकही असतात. त्यामुळेच ते विज्ञानाच इतिहासाचा भाग बनून जातात. त्यातूनच त्यांचे महत्त्व अधोरेखित होतं. प्रसिद्ध वैज्ञानिकांच जीवनात घडलेले असे काही किस्से.
डॉ. अल्बर्ट आईनस्टाईन हे विसाव शतकातील सर्वात अधिक मान्यताप्राप्त आणि लोकप्रिय वैज्ञानिक. त्यांनी विज्ञानातील महत्त्वपूर्ण संशोधनाबरोबरच, जागतिक शांतता, हिटलरला विरोध, अणुबाँब निर्मिती आणि समाजप्रबोधन या क्षेत्रात आपलं योगदान दिलं. त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. शाळेतील ढ विद्यार्थी ते विसाव्या शतकातील सर्वात बुद्धिमान शास्त्रज्ञ असा त्यांचा जीवनप्रवास होता. शालेय जीवनात शिक्षकांचं त्यांच्या विषयी चांगलं नव्हतं. याचं कारण त्यांचं वर्तन शालेय शिस्तीला धरून नव्हतं. ग़ृहपाठ न करणं, शिक्षकांना अपेक्षित प्रतिसाद न देणं, पाठांतराऐवजी समजून घेण्याकडे लक्ष देणं, अभ्यासक्रमाबाहेरील प्रयोग करणं आणि परीक्षेत अपेक्षित गुण न मिळवणं ही त्या मागची कारणं होती. साहजिकच ते दहावी (डिप्लोमा) ची परीक्षेत नापास झाले. शाळा सोडताना इतर विद्यार्थ्यांप्रमाणे आपण पुढे का करावं असे शिक्षकांना विचारलं. त्यावेळी शिक्षकांनी दिलेलं उत्तर त्यांच्या जन्मभर लक्षात राहिलं. शिक्षक म्हणाले, “नाहीतरी तुला काही येतच नाही. तू काही केलं तरी काय फरक पडणार आहे?”
हिटलरच्या उदयानंतर ज्यू द्वेषाने जर्मनीत अधिकच जोर धरला. जर्मन जनता हिटलरला निवडून देणार नाही अशी आईनस्टाईनची धारणा होती मात्र ती फोल ठरली. हिटलर सत्तेवर आल्यानंतर त्यांच्या जीवाला असणारा धोका अधिकच वाढला. गेस्टापो हे हिटलरचे सैनिक ठरवून ज्यूंची हत्या करीत. त्यांच्यापासून संरक्षण मिळावं यासाठी त्यांनी बेल्जिअममध्ये आसरा घेण्याचा निर्णय घेतला. बेल्जिअमट्या राणीने एका शहरात त्यांची राहणची व्यवस्था केली. याबाबत गुप्तता बाळगण्यात आली होती. या शहरात आपल्याला कोणी ओळखणार नाही अशी त्यांना खात्री होती. राहणच्या ठिकाणाचा पत्ता त्यांनी आपल जवळच्या मित्रालाही सांगितला नव्हता. एके दिवशी अचानक त्यांचा मित्र ते राहात होते त्या ठिकाणी दाखल झाला. त्यांना आश्चर्य वाटले. तुला हा पत्ता कसा का कळला? असे आईनस्टाईन यांनी त्यांच्या मित्राला विचारलं. त्यावर तो मित्र म्हणाला की मी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर आईनस्टाईन कुठे राहतात असं विचारलं. त्यांनी मला इथे आणून पोहचवलं. मित्राचा खुलासा ऐकून आईनस्टाईन मनोमन हादरले. आता युरोपमध्ये राहणं सुरक्षित नाही याची खात्री पटली. त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. आईनस्टाईन यांचं व्यक्तिमत्त्व आकर्षित करणारं होतं. याचा प्रत्यय अमेरिकेतही आला. अमेरिकेने अणुबाँम्ब बनवणं आवश्यक आहे असं पत्र अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला लिहिण्याचं वैज्ञानिकांनी ठरवलं. या पत्रावर आईनस्टाईनची सही तातडीने हवी होती. आईनस्टाईन मात्र कुणाला न सांगता समुद्र किनाऱ्यावरील शहरात सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. एवढ्या मोठ्या शहरात त्यांचा शोध घेणं सोपं नव्हतं. त्यांना शोधणार सहकारी वैज्ञानिकाने समुद्र किनाऱ्यावरील हॉटेलमध्ये शोध घेणचं ठरवलं. त्यात त्यांना पटकन यशही मिळालं. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका मुलाने त्यांच्या फोटोवरून त्यांना ओळखलं. एवढंच नव्हे तर तो त्या सहकाऱ्याला आईनस्टाईन जिथे विश्रांती घेत होते. तिथंपर्यंत घेऊन गेला.
आईनस्टाईन यांचा बुद्धिमत्तेबद्दल आणि त्यांच संशोधनाबद्दल सर्वत्र दबदबा निर्माण झाला होता. मात्र त्यांच वैयक्तिक आयुष्यात चांगलेच चढउतार आले. अनेक वर्षे संसार केल्यानंतर त्यांचं त्यांच्या पहिल पत्नीशी वितुष्ट आलं. मतभेद टोकाला गेल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्ण घेतला. त्यावेळी मुलांची जबाबदारी पत्नीने घेण्याचं ठरलं. साहजिकच मुलांच्या पालनपोषणासाठी लागणार खर्चापोटी काही रक्कम आईनस्टाईन यांनी पत्नीला द्यावी असं ठरलं. आईनस्टाईन यांच्याकडे तेवढी रक्कम नव्हती. त्यावेळी त्या दोघांमध्ये एक करार झाला. ते वर्ष होते १९१४ त्या करारान्वये ज्यावेळी नोबेल पारितोषिक मिळेल. त्या पोटी मिळणारी रक्कम त्यांनी पत्नीला द्यावी. पुढे १९२१ मध्ये आईनस्टाईन यांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यावेळी मिळालेली रक्कम त्यांनी कराराप्रमाणे पत्नीकडे पोहचती केली.
डॉ. फिनमन हे असंच एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. भौतिकशास्त्राचे गाढे अभ्यासक. भौतिकशास्त्रावर त्यांनी दिलेली व्याख्यानं जगप्रसिद्ध आहेत. लहानपणापासून निरीक्षणाची आवड. मुंग्यांचं वर्तन अभ्यासण्यात ते तासन्तास घालवत. बोंगो उत्तम वाजवत. बडेजाव दाखवण्याचा तिटकारा, पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणची सोय असतानाही सामान्य वस्तीतील हॉटेलमध्ये राहत. अमेरिकन सरकारच्या मोठमोठ्या सिमित्यांवर काम करताना अशा हॉटेलमध्ये फोन आला की हॉटेल मालक घाबरून जाई. त्यांचा सर्वांना संशय यायला लागे. पोलिसमधील कुणी व्यक्ती तर नाही ना असे त्यांना वाटे. फिनमन मात्र तेथील खाद्यपदार्थ, संगीत आणि रांगडेपणा यांचा मनसोक्त आनंद लुटत. मॅनसटन प्रकल्पात अणुबाँम्ब निर्मितीचं काम चालू होतं. त्या ठिकाणी शेकडो संशोधक काम करत होते. काम अतिश गुप्तपणे सुरू होते. संशोधनकांना आपली कागदपत्रे ठेवण्यासाठी लॉकर देण्यात आले होते. त्यासाठी नंबरकोडची कुलुपे होती. फिनमन पैजेवर असे कोड शोधून लॉकर उघडून दाखवत. ‘चलेंजर’ या अवकाशानाचा उडताक्षणीच स्फोट झाला. त्यात सर्व अवकाशायात्रींना जीव गमवावा लागला. अपघाताचं कारण शोधणार सिमितीत रिचर्ड फिनमन यांचा समावेश होता. त्यांनी हा अपघात ओअरिंग रबरच गोलाकार चकतीमुळे झाला हे सिद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं.
भारतीय विज्ञान संशोधनात सर सी. व्ही. रामन यांचं स्थान अग्रगण्य आहे. त्यांनी भारतीयांच्या संशोधनाला आणि बुद्धिमत्तेला प्रतिष्ठा मिळवून दिली. संशोधन करण्यात त्यांना खूप अडचणी आल्या. पारतंत्र्याचा काळ असल्यामुळे भारतीयांमध्ये संशोधनाची क्षमता नाही असं मानलं जाई.
संशोधनच काय इतर क्षेत्रातही भारतीयांना दुय्यम स्थान होतं. भौतिकशास्त्रात एम. ए. ही पदवी प्राविण्यासह प्राप्त केल्यानंतर त्यांना संशोधन करण्याची इच्छा होती. मात्र भारतात तशी संधी उपलब्ध नव्हती. नाईलाजाने त्यांनी अकाऊटंट जनरल हे पद मिळवलं. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी हा पराक्रम केला. नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली. त्यांनी एकदा इंग्रज अधिकार्याची चूक दाखवून दिली. त्यामुळे तो अधिकारी खूप चिडला. त्याने रामन यांना माफी मागण्याचा आदेश दिला. मात्र रामन यांनी तो मानला नाही. त्यामुळे चिडून तो अधिकारी रामन यांच्या टेबलाजवळ आला. रामन यांना तो म्हणाला, “या ठिकाणी मी अधिकारी आहे आणि मी सांगेन तेच तुम्ही अंतिम समजायला हवं.” रामन यांनी प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिल्यावर तो पुढे म्हणाला, “या तुमच्या टेबलावर एक लाल आणि एक निळ्या शाईची दौत आहे. मी जर म्हणालो की ही निळी शाई लाल आहे तर तुम्ही तेच म्हणायला हवं.” रामन हसले आणि म्हणाले, “तुम्ही जर असे म्हणत असाल तर एक तर तुम्ही मूर्ख आहात किंवा आंधळे आहात.” यावर मोठा गहजब झाला. रामन यांच्याविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली. रामन मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. शेवटी रामन यांचं म्हणणं मान्य करण्यात आलं.
रामन यांनी खडतर परिस्थितीत आपलं संशोधन केलं. त्यांनी त्यासाठी वापरलेली उपकरणं स्वतः बनवलेली होती. त्यासाठी ते जुन्या बाजारातून सुटे भाग मिळवून त्यांचा उपयोग करीत. अशी उपकरणं साहजिकच कमी प्रतीची असत. रामन यांनी त्यांची चिंता केली नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे विद्यार्थी त्याबाबतीत नाराज असत. असं असूनही रामन यांच्यासमोर मत प्रदर्शित करण्याची त्यांची हिंमत होत नसे. एका विद्यार्थ्याने ती हिंमत दाखवली. रामन यांच्यासमोर जाऊन त्याने आपली व्यथा मांडली. तो म्हणाला, “सर आपण संशोधनासाठी जी उपकरणं वापरतो त्यांची किंमत फक्त पन्नास हजार रुपये आहे. आपले प्रतिस्पर्धी एक लाख रुपये किमतीचे उपकरण वापरतात. तर मग आपलं संशोधन त्यांच्या तोडीचं कसं असेल?” या प्रश्नामुळे रामन जराही विचलित झाले नाहीत ते म्हणाले, “सोपं आहे आपल्या पन्नास हजारांच्या उपकरणावर तू पन्नास हजारांचा तुझा मेंदू ठेव म्हणजे ते उपकरण एक लाखाचं होईल.”
पैसे गुंतवून ते वाढविण्याच्या योजना आजही कार्यान्वित आहेत. अशा योजनांच्या प्रलोभनाला बळी पडून अनेकांनी पैसे गमावले आहेत. रामनही अशा प्रलोभनाला बळी पडले. नोबेल पारितोषिकातून मिळालेली बरीचशी रक्कम त्यांनी अशा योजनेत गुंतवली. व्हायचं तेच झालं. ती योजना बुडाली. असे असूनही योजनेच्या संचालकाने सर्व गुंतवणुकदारांची सभा बोलावली. रामन त्या सभेला हजर होते. रामन यांचा स्वभाव मिष्किल होता. कठीण प्रसंगातही त्याचं दर्शन घडत असे. संयोजकाने आपल्या भाषणात योजना बुडण्याची कारणं विषद केली. योजना बुडण्यात आपला कसा दोष नाही हेही त्याने आवर्जून सांगितलं. संयोजकाच्या भाषणानंतर रामन उभे राहिले. ते संयोजकाला उद्देशून म्हणाले, “मी आपल्या हुशारीने भारावून गेलो आहे. खरं तर नोबेल पारितोषिक तुम्हाला मिळायला हवे. मला ते चुकून मिळालं.” असे म्हणून त्यांनी नोबेलचं पदक संयोजकाच्या गळ्यात घातलं.
********
डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, संपर्क ९४२०४८३४८७
साभार- जडण-घडण, (जून २०२१)