nirvaan-shatakam-निर्वाण-षटकम्/

आज महाशिवरात्री आहे. आज अनेक साधक लोक रात्रभर जागरण करून आपल्यातील शिवत्वाला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आपल्यातील शिवत्वाला जागे करण्यासाठी प्रथम आपल्यातील शिवत्वाला जाणून घ्यावे लागते.

‘कोहम्’ अर्थात मी कोण आहे हा प्रश्न मानवाला अनादी काळापासून पडलेला आहे. यांप्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न भारतातील सर्वच आध्यात्मिक संप्रदायांनी केला आहे.

यापैकी शंकराचार्यांचा मार्ग किंवा वेदांत तत्वज्ञान म्हणजेच अद्वैत संप्रदाय याचे मत मात्र वेगळे आहे. हा संप्रदाय ‘अद्वैता’ ला म्हणजेच ‘non dualism’ ला मानतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे काही वेगळे नसून ते एकच आहे असे या मार्गाचे प्रतिपादन आहे. मी स्वतः ब्रह्म स्वरूप आहे , ‘अहं ब्रम्हास्मि’ हा या पंथाचा मूलमंत्र आहे. तर ‘ब्रम्ह सत्य जगन्मीथ्या’ म्हणजे ‘केवळ ब्रम्ह हेच सत्य आहे आणि हे जग म्हणजे केवळ मायेचा खेळ आहे’ असे या पंथाचे तत्वज्ञान आहे.

अंतिम सत्य शोधण्याचा भक्ती परंपरेचा मार्ग वेगळा आहे भक्ती परंपरेमध्ये असे मानले जाते की ईश्वर यत्र तत्र सर्वत्र भरलेला आहे. त्यामुळे जगातील सर्व चराचर वस्तूंमध्ये त्याचे अस्तित्व आहे. तो जळी, स्थळी, काष्ठी, आणि पाषाणी असा सर्वव्यापी आहे. वेदान्ताचा मात्र अजून एक वेगळा मार्ग आहे या मार्गामध्ये स्वतः चिंतन आणि तर्काच्या सहाय्याने अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येतो. यामध्ये एकानंतर एक असे प्रश्न विचारून अंतिम सत्य शोधण्यात येते.

ही पद्धत काय आहे? उदाहरणार्थ यामध्ये स्वतःलाच प्रश्न करण्यात येतो की – मी म्हणजे कोण आहे?

हे शरीर म्हणजे मी आहे का? नाही

हे माझे मन म्हणजे मी आहे का? तर नाही.

हे माझे विचार म्हणजे मी आहे का? तर नाही.

ही माझी बुद्धी म्हणजे मी आहे का? तर नाही.

हे पंच इंद्रिया द्वारे जाणवणाऱ्या अनुभूती म्हणजे मी आहे का? तर नाही.

असे प्रश्न विचारत विचारात अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा हा प्रयत्न असतो. अध्यात्मिक भाषेत यालाच ‘नेति नेति’ पद्धत म्हणजे ‘हे नाही- हे नाही’ असे म्हणतात. ‘मी कोण?’या प्रश्नावरच वेदांताचे सारे तत्वज्ञान उभे आहे.

वेदांचा विचारमार्ग म्हणजे उपनिषद आहेत. तर उपनिषदाचे सारभूत तत्वज्ञान म्हणजे वेदांत. आणि वेदांताचे सार म्हणजे आपली श्रीमदभगवद्गीता. या वेदांत सार रुपी भगवदगीतेचे स्पष्टीकरण म्हणजे आपली ज्ञानेश्वरी.

भगवद गीता जरी वेदांत तत्वज्ञानाचे सार असले तरी त्याहीपेक्षा कमी शब्दांमध्ये वेदांत तत्वज्ञानाचे सार स्वतः शंकराचार्यांनी सांगून ठेवलेले आहे. हे सार त्यांनी केवळ सहा कडव्यांमध्ये सांगून टाकले. या सहा कडव्यानाच षटकम् असे म्हटले आहे. आणि या षटकांमध्ये आत्म म्हणजे काय किंवा मी कोण आहे हे सांगितले असल्यामुळे यालाच ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. आत्म्याचे स्वरूप जाणून घेतल्यावर निर्वाण प्राप्त होते. त्यामुळे याला ‘निर्वाण षटकम्’ असेही नाव आहे.

मला मान्य आहे की, विषय थोडा रुक्ष आहे परंतु थोडे समजून घेतला तर तेव्हढाच इंटरेस्टींग देखील आहे. प्रयत्न करायला काय हरकत आहे?

खाली मी मूळ संस्कृत षटक, त्याचा मराठी शब्दनुवाद आणि इंग्रजी अनुवाद (यथामती आणि यथाशक्ती) केलेला आहे. आवडले तर खाली बॉक्स मध्ये अवश्य प्रतिक्रिया कळवा. काही सुधारणा आवश्यक वाटल्यास सुचवा.

आज शिवरात्रीच्य जागर रात्री भगवान शिव तुम्हाला आत्मस्वरूप जाणून घेण्यासाठी मदद करो.

ओम नमः शिवाय ।

मनोबुद्ध्यहङ्कार चित्तानि नाहं
न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः
चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥१॥

मी मन नाही, बुद्धी नाही, अहंकार नाही, चित्त देखील नाही, न मी कान आहे, न मी जिव्हा आहे, ना मी घ्राणेंद्रिय (नाक) आहे, न मी नेत्र आहे, ना मी व्योम (आकाश) आहे, ना मी भूमी, न तेज, न मी वायू आहे. मी चिद आनन्द स्वरूप शिव आहे. मी शिव आहे.

Neither am I the Mind, nor the Intelligence or Ego, Neither am I the hearing organs/Ears, nor organ of Tasting /Tongue or organ of Smelling/Nose or organ or vision/Eyes. Neither am I the Sky, nor am I Earth, Neither Fire nor Air, I am Shiva with Pure Blissful Consciousness, I am Shiva,

न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायुः न वा सप्तधातुः न वा पञ्चकोशः । न वाक्पाणिपादं न चोपस्थपायु चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥२॥

न मी पंचप्राण आहे, न मी शरीरात वसणारे पंचवायू, सप्तधातु किंवा पंच कोष आहे. ना मी वाक् (वाणी), पाणी (हात), पाद (पाय) किंवा गुदा प्रजननाचा अवयव आहे. (मी केवळ वचन, संग्रहण, सुगती, प्रजनन किंवा निष्कासनाचे माध्यम मात्र नाही.) मी चिद आनन्द स्वरूप शिव आहे. मी शिव आहे.

Neither am I Pran/Breath, nor I am the Five gatus/Airs, Neither am I the Seven dhatus which formed my Body, nor the Five Sheaths of body, Neither I am organ for Speech, nor the Hand or Feet or organ for Excretion, I am Shiva with Pure Blissful Consciousness, I am Shiva,

न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैव मे नैव मात्सर्यभावः । न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥३॥

न मी द्वेष, राग, लोभ मोह नाही, न मी मंद आहे ना मी मत्सरभाव आहे, (मी षडविकार नाहीच नाही). न मी धर्म, अर्थ, काम, मोक्ष यापैकी काही आहे (ना मी चार पुरूषार्थ आहे). मी चिद आनन्द स्वरूप शिव आहे. मी शिव आहे.

Neither do I have Hatred, nor Attachment, Neither Greed nor Infatuation. Neither do I have Pride, nor Feelings of Envy or Jealousy, I am Not bounded by Dharma (Righteousness), Artha (Wealth), Kama (Desire) and Moksha (salvation) (the four Purusarthas), I am only Pure Blissful Consciousness. I am Shiva.

न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः । अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥४॥

मी पापही नाही अन पुण्यही नाही. मी सुख ही नाही अन दुःखही नाही. मी मंत्र, तीर्थ, वेद किंवा यज्ञ यापैकी काही नाही. न मी भोज्य (अन्न) आहे, ना मी भोक्ता (अन्न ग्रहण करणारा) आहे, ना मी ग्रहण करण्याची प्रक्रिया (भोजन) आहे. मी चिद आनन्द स्वरूप शिव आहे. मी शिव आहे.

Neither I am bounded by sanity nor by Sins, neither by Worldly pleasures nor by Sorrows Or grief, Neither am bounded by Hymns nor by Sacred Places, neither I am bounded by Sacred Scriptures nor by Sacrifies, Neither I am bhojan/food (karm), nor I am who consumes/eat (karta), nor I am experience of eating (kriya). I am only Pure Blissful Consciousness. I am Shiva.

न मृत्युर्न शङ्का न मे जातिभेदः पिता नैव मे नैव माता न जन्मः । न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्यं चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥५॥

ना मला मृत्यूभय आहे, ना स्वरूपा बद्दल मला शंका आहे, न मी जातीभेद मानणारा आहे. मी शिव स्वरूप असल्यामुळे मला न माता आहे, न पिता आहे. न मी कोणता जन्म घेतला आहे. न मला कुणी बंधू, मित्र. न कुणी माझा गुरू आहे किंवा शिष्य आहे. मी चिद आनन्द स्वरूप शिव आहे. मी शिव आहे.

Neither I have Death and its Fear, nor I bound by rules of Caste or practice of Discrimination. Neither I have Father nor Mother, nor do I have Birth. Neither I have any Relations like Friend or brother. Neither i have any Spiritual Teacher or Disciple, I am only Pure Blissful Consciousness. I am Shiva.

अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् । न चासङ्गतं नैव मुक्तिर्न मेयः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥६॥

मी निर्विकल्प आणि निराकार रूप आहे. मी सर्वांभूती असणारा (सर्वव्यापी) आहे, मी सर्व इंद्रियांना व्यापणारा आहे. न मी कशाचाही संगती ने बद्ध होणारा आहे (निःसंग), न मी कशापासून मुक्त होणारा आहे (अर्थात न मी बद्ध आहे, न मी मुक्त आहे.) मी चिद आनन्द स्वरूप शिव आहे. मी शिव आहे.

I am one Without Variation, and Form, I am Omnipresent as the underlying of everything, and behind the Senses of all Organs, Neither I get Attached, nor get Freed from anything, I am only Pure Blissful Consciousness. I am Shiva.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: