OPEN- an autobiography of Andre Agassi हानिकारक बापू – आंद्रे आगासी चे आत्मचरित्र

शेअर करा

गेल्या दोन-तीन महिन्यात चार चांगली पुस्तके वाचण्यात आली. त्यापैकीच एक म्हणजे आंद्रे आगासी ची ऑटोबायोग्राफी “OPEN”. लहानपणापासून तर त्याचा टेनिस मधून निवृत्ती पर्यंतचा काळ खूप छान शब्दबद्ध केलाय. मला टेनिस ची आवड मी नववी दहावीत असताना लागली. त्यामुळे त्याचा टेनिस मधला सुरुवातीचा प्रवास वाचताना खूप मजा आली. अक्षरशः माझ बालपण पुन्हा माझ्या डोळ्यासमोरून तरळले. पुस्तक खूप छान आहे, संधी मिळाली तर जरूर वाचा.


शेअर करा

OPEN- an autobiography of Andre Agassi हानिकारक बापू – आंद्रे आगासी चे आत्मचरित्र Read More »

What is IPO? आयपीओ म्हणजे काय?

शेअर करा

सगळ्याच कंपन्यां शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नसतात. परंतु जेव्हा एखादी कंपनी आपले शेअर शेअर मार्केट मध्ये ते खरेदी साठी उपलब्ध करण्याचे ठरवते तेव्हा त्या कंपनीला सर्वप्रथम शेअर मार्केट मध्ये स्वतःला नोंदणीकृत करावे लागते. एखादी कंपनी जेव्हा आपले शेअर्स बाजारांमध्ये विक्रीसाठी पहिल्यांदाच आणते तेव्हा त्याला …..


शेअर करा

What is IPO? आयपीओ म्हणजे काय? Read More »

What is ”Share’? शेअर म्हणजे काय?

शेअर करा

जो व्यक्ती कंपनीचे शेअर खरेदी करतो तो आपला पैसा कंपनीला वापरण्यासाठी देतो. त्याबदल्यात त्याला शेअर्स ची मालकी मिळते. कंपनीला हा पैसा एकदा मिळाला म्हणजे नेहमीसाठी वापरण्यास मिळतो. हा पैसा गुंतवणूकदारास परत करायची गरज नसते. तसेच यावर कुठले व्याजही देणे बंधनकारक नसते. तरीदेखील सामान्य गुंतवणूकदार कंपन्यांचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करतात. यामध्ये सामान्य गुंतवणूकदारांचा काय फायदा?


शेअर करा

What is ”Share’? शेअर म्हणजे काय? Read More »

Mama Shree मामाश्री

शेअर करा

शेअर करा        मामांश्रींशी आमची पहिली ओळख आणि भेट तशी पाटील कॉलनीतच झाली. (खरं तर ते माझे काकाश्री. पण शिंदे परिवारातील सगळे मामाश्री म्हणायचे म्हणून मी देखील मामाश्री म्हणतो.) नंतर उस्मानपुऱ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमात, निवांतपणे होणाऱ्या भेटींमध्ये मग मामाश्री हळू हळू समजायला लागले. वयस्कर पण शरीरावर वयाचा प्रभाव न जाणवू देणारी अंगकाठी, साधी पण समोरच्याच्या अंतःकरणात उतरून


शेअर करा

Mama Shree मामाश्री Read More »

Chandrabhga Aaji चंद्रभागा आजी

शेअर करा

कधी कधी मला वाटतं की आजीचं आयुष्य म्हणजे जणू काही संत तुकारामाच्या अवलीचे प्राक्तन. संत तुकारामाच्या आवलीचं जसं झालं तसंच आजीच्याही वाट्याला आलं. काय म्हणून केलं नाही तिने तुकोबांसाठी? या आवलीने देवभक्तीत रंगलेल्या, घर-संसार विसरलेल्या तुकारामाची संसाराची सगळी आघाडी सांभाळली. भांडाऱ्याच्या डोंगरात काटे कुटे तुडवीत तुक्याच्या भुकेची भाकर झाली. महिनोन्महिने नामस्मरणात दंग तुकोबांचा संसार सांभाळला. पोराबळांचे सर्व काही पाहिले. तुकाराम महाराज वारीला गेल्यावर त्यांच्या येण्याची वाट पहात सर्व कर्तव्ये पार पाडली. आलेल्या संतमंडळींना कोंड्याचा मांडा करून खाऊ घातले. अडचण असून देखील नवऱ्या साठी मावंदे देखील घातले. गाभण जनावरांची आई झाली. एवढेच काय त्यांच्यासाठी वैकुंठाचा मोह टाळला. सर्वांना तिचा राग दिसला पण त्याग मात्र दिसला नाही. तुकाराम संत बनून सर्वांच्या नमस्कारास पात्र झाले. पण आवली मात्र उपेक्षितच राहिली. तुझीही कहाणी काहीशी अशीच आहे आजी. तूझ नाव चंद्रभागा. विठुरायाच्या गजरात चंद्रभागेच्या वाळवंटाकडे कुणाचं लक्षच गेलं नाही आजी.


शेअर करा

Chandrabhga Aaji चंद्रभागा आजी Read More »

KANAA by Kusumagraj कणा

शेअर करा

सर्व काही उध्वस्त झाल्यावर देखील काही माणसे हरत नाहीत, हरवत नाहीत. परिस्थितीशी समझौता करत नाहीत. ती पुन्हा उभी राहतात. नव्याने. अशा लोकांचे एकच ब्रीदवाक्य असते. “पाठीवरती हात ठेवून फक्त ‘लढ’ म्हणा. आशा लोकांबद्दलची, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती बद्दलची, त्यांचा आशावाद व्यक्त करणारी कुसुमाग्रजांची ‘कणा’ ही कविता.


शेअर करा

KANAA by Kusumagraj कणा Read More »

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी

शेअर करा

अशाच एका कुटुंबात एक मुलगी जेंव्हा नववधू म्हणून जाते. सहाजिकच तिला तिथे जुळून घेण्याला त्रास पडतो. आणि मग ती फक्त नवरा-बायको असं वेगळं राहायचं खूळ डोक्यात घेते. आणि एक एक करून एकत्र कुटुंबातल्या समस्यांचा पाढाच सांगायला सुरुवात करते. शेवटी नवर्याला पटवून ती वेगळं राहायला जाते. वेगळं राहायला लागल्यावर तिला अनेक समस्या येतात. आणि मग वेगळं राहण्यामधील सुख याबाबतीत तिचा अपेक्षा भंग कसा होतो याचे मजेदार वर्णन मो. दा. देशमुख किंवा मोरेश्वर देशमुख यांनी आपल्या ऊन ऊन खिचडी या कवितेत आपल्याला केले आहे


शेअर करा

Un Un Khichadi ऊन ऊन खिचडी Read More »

अर्धसत्य Ardhsatya

शेअर करा

अजून जास्त काय सांगु?.

तेंडुलकरांची पटकथा, निहिलांनीचे दिग्दर्शन, ओमपुरी आणि सदाशिव अमरापूरकरांचा अभिनय, स्मिता पाटीलची सहज पण दमदार भूमिका, गुलाबी स्वप्न न दाखवता आयुष्याचे भीषण वास्तव दाखवणारी पटकथा, या एकेका कारणासाठी हा चित्रपट आवर्जून पहावा असाच आहे. पण केवळ या कवितेसाठी देखील हा चित्रपट पाहता येईल.


शेअर करा

अर्धसत्य Ardhsatya Read More »

वामांगी Vamangi by Arun Kolatkar

शेअर करा

देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रखुमाय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो
असु दे
रखुमाय तर रखुमाय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून


शेअर करा

वामांगी Vamangi by Arun Kolatkar Read More »

First Statue of Shivaji Maharaj in world शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारला?

शेअर करा

आज आपण जर रायगडावर गेलो तर तिथे सिंहासनाची जागा आहे. पूर्वी तिथे फक्त एक चौथरा होता. रायगडावर सिंहासनाच्या जागेवर आज जो शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तो फार नंतरच्या काळात बसवण्यात आला.मग शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कोणी बनवला आणि कुठे बसविण्यात आला?
अभिमानाची गोष्ट अशी आहे की शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा महाराष्ट्रातच  बनवण्यात आला.


शेअर करा

First Statue of Shivaji Maharaj in world शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारला? Read More »